अकोल्यात बुलेट दुचाकीला आग, गांधी रोड परिसरात खळबळ..अकोला शहरातील महानगरपालिकेजवळ सायंकाळी रस्त्यावर उभी असलेली बुलेट दुचाकी अचानक पेट घेत जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. काही लोकांनी मोठे धाडस करून ही आग विझवली