नगर-मनमाड महामार्गावर राहुरी तालुका हद्दीत गेल्या सहा दिवसांत चार ठिकाणी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राञीच्या सुमारास राहुरी खुर्द येथे दोघेजण मोटरसायकलवर रस्ता पार करत असताना त्यांच्या मोटारसायकल ला एका कंटेनरने जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश साबळे हे जागीच ठार झाले. तर एकजण बालंबाल बचावले आहेत.