चिखलदरा तालुक्यातील चित्री गावाजवळ काल सायं ६ वाजताच्या सुमारास एक दुचाकी पुलावर जाऊन आदळली,त्यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असल्याची माहिती आज दुपारी १ वाजता प्राप्त झाली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मृतकाला व गंभीर युवकाला उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन व उपचारासाठी दाखल केले.मृतक निलेश विनोद वानखेडे वय ४५ वर्ष व निलेश लोखंडे वय ३५ वर्ष रा.अमरावती हे त्यांच्या दुचाकीने अमरावती येथून धारणी येथे नातेवाईकांकडे जात असताना चित्री गावाजवळ नियंत्रण बिघडले .