राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजतप आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती आणि एकता संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.