अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस, तुझे अतिशय मनापासून अभिनंदन. मला याची जाणिव आहे की, तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडिल स्व. संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण, तुझ्या पाठिवर कौतुकाची थाप आज संपूर्ण महाराष्ट्र देतोय. ८५.३३ टक्के गुण संपादन करुन तू अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केला आहेस. तुझे कौतुक करावे तितके कमी आहे. तू अशीच प्रगती करीत रहावी, अशा शुभेच्छा दिल्या.