ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) अंतर्गत खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मधून गंभीर जखमी अवस्थेतील वाघ T-१२६ याच्या बचाव मोहिमे (Rescue) अंतर्गत त्याला यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आले आहे. सदर वाघास आवश्यक वैद्यकीय तपासणी व पुढील उपचाराकरिता ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.