चाळीसगाव, २४ ऑगस्ट: चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नुकतेच लोकार्पण झाले. या सोहळ्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय वंचित घटकांना न्याय देणारा आहे.