आपल्या उत्कृष्ट कामामुळे वन विभागात वेगळी ओळख निर्माण करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी सुनील वाकोडे हे बुलढाणा आरएफओ पदी रुजू झालेले आहे. वन्यजीव संरक्षणात रुची असल्याने सुनील वाकोडे यांनी सलग 21 वर्ष मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आपली सेवा दिली आहे.तसेच बुलढाणा आरएफओ अभिजित ठाकरे यांची बदली अकोट वन्यजीव विभागात करण्यात आली आहे.