गावातील अंगणवाडी संदर्भात एक तरुण आंदोलन करत होता. 'आंदोलनकर्त्या तरुणाला साथ का देता?' म्हणून कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील जळगव्हाण या तांड्यावर घडला आहे.अजित पवार गटाच्या सरपंचाने त्याच्या सहा सहकाऱ्यांसह अनिल चव्हाण या तरुणाच्या घरी गेले. त्यानंतर काठी दगड आणि कोयत्याने अमानुष मारहाण केली. तरुणासोबत महिलांनाही मारहाण झाली आहे. या घटनेत दोन महिला जखमी आहेत. तरुणाला मात्र किरकोळ मार लागला आहे.