मुंबईतील कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्यावर फक्त काही महिन्यांतच २० फुटांचा मोठा खड्डा पडला आहे. यामुळे सरकारचे आणि कंत्राटदारांचे निकृष्ट काम पुन्हा एकदा समोर आले आहे.या खड्ड्यामुळे महायुती सरकारचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला असून हा भ्रष्टाचारी खड्डा देशाच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.