लातूर- लातूर शहरामध्ये आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी बारा वाल्यापासून गणेश विसर्जना सुरुवात झाली असून विविध गणेश मंडळे आपली मिरवणूक काढून गणेशाचे विसर्जन करत असून या गणेश विसर्जन प्रसंगी विविध सांस्कृतिक तसेच अघोरी नृत्य सादर करत गणेश मंडळे गणेशाला निरोप देत जात आहेत. त्यामुळे लातूर शहरातील विविध भागात गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी विविध पक्षाचे व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने लातूर शहरातील मुख्य चौकात स्टॉल उभारण्यात आले.