महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष मेहबुबभाई शेख यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रोशन कोमरेड्डीवार यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील पक्षकार्यालयात त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रांताध्यक्ष मेहबुबभाई शेख यांच्यासह अन्य मान्यवर ऊपस्थीत होते. नियुक्ती बद्दल कोमरेड्डीवार यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.