हिंगोली दुग्ध व्यवसायातून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी बँकेत कर्जासाठी अर्ज करताना नियोजित प्रकल्प तयार ठेवावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे यांनी यावेळी केले.वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे आयोजित दूध उत्पादक शेतकरी कर्जमेळाव्यात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. झोडगे यांनी शेतकऱ्यांना आज मार्गदर्शन केले. यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे, बँक व्यवस्थापक शालिकराम जाधव, प्रदीप महाजन, श्रीपाद दैठणकर, राहुल बेंदोले, सहाय्यक आयुक्त (वसमत) डॉ. अजय मुस