फुलंब्री येथील खुलताबाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून सदरील पाण्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी व्यवसायिकांनी केली आहे. परिणामी वाहनचालकांना देखील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागला.