नांदेड जिल्ह्यात गवंडी व बेलदार या जातीच्या समकक्षतेबाबत त्या समाजाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या मांडल्या. सदर मागण्याबाबत पडताळणी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारोती शिकारे यांनी दिल्या.आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे व डॉ. मारोती शिकारे या