शहरात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील माळवेस भागात आज सकाळी नागरिकांना नाल्यामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. अचानक हा मृतदेह नजरेस पडताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळावर लोकांची मोठी गर्दी जमा झाली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून तो ताब्यात घेतला.