भंडारा शहरातील पट्टेधारक नागरिकांना घरकुल मिळावे. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपरिषद भंडारा येथे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भंडारा शहरातील टाकळी परिसरामध्ये 1962 मध्ये पूरपीडीत नागरिकाना शासना कडुन पट्टे वितरित करण्यात आले होते. पण पट्ट्यांवर वारसानाची नोंद घेण्याची तरतूद शासनाकडे नसल्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलच्या लाभ घेता येत नसल्यामुळे स्थानिक गोरगरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.