यवतमाळ येथील दारव्हा रोडवरील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात आयोजित रामकथा पर्वाच्या चौथ्या दिवशी आज, ९ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता भाजप नेत्या तथा माजी खासदार.नवनीत रवी राणा यांनी गौरवपूर्ण उपस्थिती दर्शविली. यावेळी प्रसिद्ध आध्यात्मिक संत आणि प्रख्यात कथाकार मोरारीबापू यांचे त्यांनी आशीर्वचन घेतले. दरम्यान रामकथेचे यजमान डॉ. विजय दर्डा यांनी मा.खा.नवनीत राणा यांचा सन्मान केला. यावेळी माजी खासदार रामदास तडस, आमदार बाळासाहेब मांगरूळकर, माजी आमदार कीर्ती गांधी, किशोर दर्डा....