दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या इमारतींवर महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे. अर्धव्याप्त,व्यावसायिक आणि निवासी इमारती रिक्त करून त्या पूर्णपणे जमीनदस्त केल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बी आर नगर येथील दोन, सद्गुरु नगर येथील दोन आणि दिवा शीळ रोड येथील एक अशा एकूण पाच इमारती पोकलेन मशीनच्या सहाय्याने जमीन दोस्त केल्या आहेत. यापुढे देखील अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त यांनी दिली आहे