महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुडुसी येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यासाठी व नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी गुढीपाडवा मेळावा यशस्वी व्हावा या दृष्टीने नियोजन करण्यात आले व पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.