लातूर-, लातूर जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2025 ते 6 सप्टेंबर, 2025 या कालावधीत गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात यांची साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी 27 ऑगस्ट 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे, तसेच 2 सप्टेंबर, 2025 रोजी उदगीर नगर परिषद हद्दीतील सर्व किरकोळ अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत.