बीडच्या पोखरी येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच मराठा समाजाचे नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा लावलेला बॅनर पोखरीत (बीड-वडवणी महामार्गावर) अज्ञात व्यक्तींकडून फाडून विटंबना करण्यात आल्याची गंभीर घटना आज गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांत संतापाची भावना पसरली असून परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आण