काल सायंकाळच्या सुमारास मुंब्रा परिसरातील विराणी पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. पेट्रोल भरण्यासाठी एका रांगेतील असे पेट्रोल करून पंपावरील कर्मचारी एका वाहन चालकाला म्हणत होता. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मात्र तरीही कर्मचारी वारंवार त्याला रांगेत येण्यास सांगू लागला त्यामुळे संतापलेल्या वाहन चालकाने थेट कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाहन चालकाचे साथीदार एकत्र आले आणि दोन गटात फ्रीस्टाइल हाणामारी झाली.