संजय गांधी निराधार, दिव्यांग, श्रावणबाळ योजनेचे मागील ५ महिन्याचे मानधन थकीत असल्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून सर्व लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे याकरिता आज १० सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी १ वाजता प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे भीक मागो आंदोलन करण्यात आले..