वनसडी येथील अनेक तरुणांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा आज दि.31 आगस्ट ला 10 वाजता राजुरा येथील आमदार भोंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या नवप्रवेशितांमध्ये महेश्वर कोल्हेकर, अजित उरकुडे, अमर, अनिकेत आंबेकर, विठोबा श्रीरसागर, गणेश आत्राम, गौरव, स्नेहंकित डाखरे, प्रतिक पिंपळकर, प्रणय महाकुलकर, विश्वजित सोनटक्के , पंकज वाढई, आदींचा समावेश आहे.