हॉटेलमध्ये दारूचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून चार जणांनी मित्राचा खून केला. ही घटना मंगळवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी तळवडे येथील सम्राट गार्डन हॉटेल येथे घडली. गणेश लक्ष्मण पोखरकर (३४, विठ्ठलवाडी देहुगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष बांबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.