महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वडगाव फत्तेपुर येथील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या तीन दुधाळ म्हशींचा तुटलेल्या तारेच्या संपर्कात आल्याने आज सकाळी १० वाजता करुण अंत झाला.पशुपालक राजाजी शंकरजी येवले यांच्या म्हशी गावाजवळील जंगलात चरत असताना रोहित्रावरील विद्युत वाहिनीचा तुटलेला तार जमिनीवर पडलेला होता.त्या तारेला म्हशींचा स्पर्श होताच एकामागून एक तीन म्हशी ठार झाल्या.या अपघातात सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून आणखी एक गाय व एक म्हैस गंभीर जखमी झाल्या आहेत.