पुलगाव शहरातील हिंगणघाट फैल आणि इंदिरानगर या प्रभागांतील नागरिकांसाठी एक मोठा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पट्टे वाटपाचा महत्त्वाच्या प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने निघाला आहे. पुलगाव नगरपरिषदेने 'सेवा पंधरवडा' या उपक्रमांतर्गत हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांच्या हक्काच्या या मागणीला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. असे आज 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे