घुग्घूस येथे बॅटरी चोरी प्रकरणातील तीन आरोपीना पोलिसांनी आज दि 31 आगस्ट ला 12 वाजता अटक करून साठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.बॅटरी चोरी गेल्याची तक्रार फिर्यादीने पोलिसात दिली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्र फिरविली व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी सद्दाम मुस्ताक शेख रा. बँक ऑफ इंडिया च्या मागे, रोशन बोगाडे, बाजारवार्ड व रितिक त्रिकुटला, बँक ऑफ इंडिया च्या मागे सर्व रा. घुग्घूस यांचेवर कलम 305(ए)बिएनएस चा गुन्हा नोंद करून अटक केली.