ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात चंद्रपूर जिल्ह्यांमधील ओबीसी संघटनाचे प्रतिनिधि व सकल ओबीसी समाज यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दि. 1 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता ॲड . पुरूषोत्तम सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली धणोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूर पार पडली. या बैठकीत ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.