नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धेत शहरातील बेंड द बार जिमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी सादर करीत सुवर्णपदक पटकाविले. ६६किलो वजनगटात अमोल आवळे यांनी प्रथम क्रमांक पटकाऊन सुवर्णपदक पटकाविले व स्ट्रॉंग मैन आफ द महाराष्ट्र हा खिताब मिळवीला.५९किलो वजनगटातील जुनीयर गटात यश वाघमारे यांनी व्दितीय तर ५८ किलो गटातील सब जुनीयर गटात भुषण ताजणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. यशस्वी खेळाडुंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.