भांडणे मिटवण्याचा बहाणा करून एका टोळक्याने दगड, लोखंडी हत्यार व चामड्याच्या पट्ट्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील श्री.अंबरनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या रस्त्यावर शुक्रवारी (ता.22) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे.