नाशिक शहरा जवळ आडगावनजीक आज दि.16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राज्याच्या आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांनी बिराड मोर्चाला भेट देत संवाद साधत मोर्चेकरांना आश्वासन देत मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता हा रस्ता रोको बिऱ्हाड मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित झाला असून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर मागण्यांना मान्य झाल्यास पुढील मोर्चा काढला जाईल असा मोर्चेकरांनी पवित्र घेतला. यावेळी मंत्री व आंदोलनकर्ते यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली.