अकोल्याच्या अकोला-गायगाव रोडवरील बनश्या नाल्याला अचानक आलेल्या लोंढ्यामुळे टँकर अनियंत्रित होऊन पुलावरून खाली उतरले. टँकरमधील चालक विजय अमृतवार आणि वाहक गणेश अंगारे पाण्याच्या प्रवाहात अडकले होते. पोलिस आणि गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांच्या मदतीने दोघांची सुखरूप सुटका केली. डाबकी गावातील चंद्रकांत पाटील, महेंद्र लोमटे, राहुल लोंढे, विशाल मोरे, पंकज मोरे, पप्पू मोरे या तर यांनी दोघांची सुटका केली आहे.