डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातील आश्रम शाळा विद्यार्थ्यांना जेवण पुरवठा करणारी पिकप पलटी झाल्याची. डहाणू तालुक्यातील कासा सायवन रस्त्यावरील बापूगाव येथे शासकीय आश्रमशाळांना जेवण घेऊन जाणारी पिकप पलटी झाली आहे. त्यामुळे तीन आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पर्यायी व्यवस्था झाली नसल्याने विद्यार्थ्यांना भोजन मिळाले नव्हते.