उत्तर नागपूर मधील समता नगर रोड बाबा दीप नगर भागात गेल्या एक वर्षापासून रस्त्यावर खड्डे असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान वारंवार तक्रार करूनही यावर कोणत्याही प्रकारची समाधान झाले नाही त्यामुळे 13 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता नागरिकांनी आणि समाजसेवकांनी मिळून या खड्ड्यांचा पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी खड्ड्यांवर केक कापण्यात आला मेणबत्त्या पेटविण्यात आल्या आणि पोस्टर बॅनर द्वारे प्रशासनाकडे जबाबदारी पार पाडण्याची मागणी करण्यात आली.