भंडारा तालुक्यातील कारधा जवळच्या वैनगंगा नदी पुलावर अज्ञात पांढऱ्या रंगाची स्विफ्ट चारचाकी वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने लापरवाहीने चालवून स्कुटी क्रमांक एमएच 36 एडी 1480 या स्कुटीला धडक दिली. ही घटना दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 1.15 वाजता दरम्यान घडली. या अपघातात स्कुटी चालवीत असलेली वनश्री पंकज बागडे वय 32 वर्षे हीला किरकोळ दुखापत झाली. तर वनश्री हिच्या बहिणीची मुलगी अधिरा शिल्पेन्द्र मेश्राम वय 10 वर्षे रा. कारधा ही जखमी झाली.