आगामी दसरा आणि दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी रोडदरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे.