लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने त्यांच्या सामाजिक दायित्व विभागांतर्गत मुरसा गावातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.गावातील नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आज दि.२६ ऑगस्टला १२ वाजता येथे जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.