हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेरिटोरियस स्कूलतर्फे तिरोडा शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.सायकल रॅलीची सुरुवात शहरातील गांधी प्रतिमा येथून करण्यात आली व गजानन मंदिर परिसरात तिचा समारोप झाला. गट शिक्षणाधिकारी स्वप्नील रामटेके यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ केला. या प्रसंगी शाळेचे संचालक मुकेश अग्रवाल, प्राचार्य प्रफुल्ल तिवारीशिक्षण तद्न ब्रजेश मिश्रा क्रीडा शिक्षक मुकेश शेंडे व संकेत मोहोड़ यांची प्रमुख उपस्थिती होती