परभणी शहरातील जितुर रोड आय.टी.आय. कॉर्नर ते समशानभुमी आणि कवडगांव गेटचा रस्ता अनेक वर्षापासून सुरु होता. मागील काही दिवसात आय.टी.आय कॉलेजने संरक्षण भिंतचे कामे केले, त्यामुळे हा रस्ता बंद झालेला आहे. टोच नकाशा व कागदपत्रानुसार 33 मिटरचा रुंद रस्ता आहे. सदरील रस्ता सर्व नागरिकांच्या रहदारीसाठी चालू करावा अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आज गुरुवार 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता केली आहे.