सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात एका महिलेने चार अपत्यांना जन्म दिला आहे. जिल्हा रुग्णालयातील दहा वर्षानंतरची ही गौरवशाली घटना आहे. महिला आणि चारही अपत्ये सुखरूप आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली. सातारा येथे शनिवारी दुपारी दोन वाजता त्यांनी जिल्हा रुग्णालयात पत्रकारांना याबाबत माहिती दिली. जिल्हा रुग्णालयामध्ये स्त्रीरोग विभाग उत्कृष्टपणे कामकाज करत आहे.