ब्राम्हनी फाटयाजवळ आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मयत युवक हा कायर येथील असल्याचे निष्पन्न झाले. अजय पुंडलिक शेंडे (30) रा. कायर असे मृतकाचे नाव आहे. मृतक हा 18 सप्टेंबर पासून घरातून बेपत्ता होता. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रारही दाखल करण्यात आली होती.