'मुझे मराठी नही समजती,हिंदी मे बोलो' असे उर्मटपणे बोलणाऱ्या परप्रांतीय कॉल सेंटर टीम लीडर ला मनसेने चांगलीच अद्दल शिकवली आहे. रबाळे येथील ही घटना असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनसेचे विभागाध्यक्ष अमृत जावळे यांना माहिती मिळताच त्यांनी कॉल सेंटरच्या कार्यालयाला धडक देऊन जाब विचारला आणि माफी मागायला लावली.