एका अकॅडमी चालकाला गांजा आणि पिस्तूलच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट फलटण ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला असून, या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. व्यावसायिक स्पर्धेतून एका व्यावसायिकाच्या गाडीत १८ किलो गांजा आणि गावठी पिस्तूल ठेवून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार मात्र फरार झाला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून शुक्रवारी सकाळी 11 वाजता माहिती देण्यात आली.