सेनगांव तालुक्यातील खुडज फाटा या ठिकाणी आज सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्तारोको आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला आहे. तसेच याप्रसंगी एक मराठा लाख मराठा अशा प्रकारचा विविध घोषणा देखील देण्यात आल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनकर्त मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले असून त्यांच्या समर्थनार्थ शेकडो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत तर मनोज जरांगे पाटील यांना जाहीर समर्थन दर्शवण्यासाठी भव्य असा रस्तारोको करण्यात आला.