दि.9 सप्टेंबरला ग्रामपंचायत कार्यालय मूडीपार येथे तंटामुक्ती गाव समितीची निवडणूक पार पडली.लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून माधोराव हनवत तर भाजप कडून भुरन रंहागडाले उभे होते.यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले.309 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.यात 2 मतांनी माधोराव हनवत यांचा विजय झाला.तर भूरण राहागडाले यांचा पराभव झाला.हनवत यांनी आपल्या विजयाचे श्रेय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांना दिले आहे. यावेळी फटाके फोडून विजय उत्सव साजरा करण्यात आला.