आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी एकत्र येत गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे या जल्लोषाचे कारण मनोज जरांगे पाटील हे मागील 5 दिवसापासून मुंबई आझाद मैदान येथे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी व आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी विविध मागणी घेऊन उपोषण करत होते,या मागण्यास सरकारने आज मान्य करत जीआर काढल्याने जल्लोष करण्यात आला.