भंडारा तालुक्यातील पहेला येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलपहेला रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशा प्रकारची या रस्त्याची दयनीय अवस्था आहे. मागील दोन वर्षापासून स्थानिक जनतेकडून, ग्रामपंचायत कडून, मागणी करण्यात येत आहे. परंतु जनप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, यांचे या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या रस्त्याने साधी टू व्हीलर चालवता येत नाही. ठीकठिकाणी खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचलेले आहे.