प्रियकराशी प्रेमसंबंध तोडल्याने त्याने युवतीचे लग्न तिसऱ्यांदा मोडल्याने 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याची घटना अमृतधाम परिसरात घडली.युवतीचे भावेश वाघ याच्याशी प्रेमसंबंध होते.त्याचे यापूर्वी लग्न झालेले असतानाही त्याने युवतीला कळू न देत तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले.मयत युवतीच्या बहिणीला त्याच्याशी लग्नाबाबत समजताच तिने ही माहिती युवतीला दिली. त्यानंतर युवतीने भावेशशी संबंध तोडले परंतु तरीही भावेश तिला लग्नासाठी त्रास देत होता. त्यामुळे तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.